महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात वसलेला आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारा बीड जिल्हा आहे.
महाराष्ट्र मध्ये या जिल्ह्याची ओळख उसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून आहे. या आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीमुळे उपजीविकेच्या पर्यायी शाश्वत स्रोतांची निवड, गरिबी, स्थलांतर, ऊस तोडणे आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या निर्माण होतात.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण ४३.७ %. एवढे जास्त होते. तसेच २०११ च्या जनगणनेनुसार, बीड जिल्ह्यातील बाल लिंग गुणोत्तर हे देशातील सर्वात कमी सुमारे ८४० इतके कमी असल्याचे आढळून आले.
हे कमी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि UNICEF-SBC3 च्या सहकार्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑगस्ट २०२१ रोजी बीड जिल्ह्यात जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली.
हे कृती दल बालविवाह कमी करणे, तसेच मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे.
या कृती दलातील एकात्मिक बाल विकास सेवा विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, पंचायत विभाग आणि पोलीस विभागांनी बीड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा कृती आराखडा तयार केला असून आराखड्याच्या अंमलबजावणीचे निरीक्षण व मूल्यमापन करिता हे पोर्टल उपयुक्त असेल.